दिव्यात महायुतीच्या चौक सभांचा धडाका
शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांची विरोधकांवर सडकून टीका
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १६ मे : कल्याण लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु असून प्रचाराचा धुरळा उडत आहे. दिवा शहरात देखील रॅली तसेच चौक सभांचा धडाका सुरु असलेला पहावयास मिळत आहे. दिव्यात प्रचारात एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत. नुकतीच दिव्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई व मित्र पक्षांच्या महायुतीच्या चौक सभानां मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. शिवसेना प्रवक्ता ज्योतीताई वाघमारे यांनी काल आपल्या भाषणात ठाकरे शिवसेनेवर सडकून टीका केलेली पहावयास मिळाली.
महायुतीचे कल्याण लोकससभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यातील डपिंग, दिवा रेल्वे स्थानक कायापालट, दिवा शहरातील रस्ते, नवीन ६०० मी मी व्यासाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच १४ इमारतीवर होणारी कारवाई थांबविली असे अनेक प्रश्न मार्गी लावणारे स्वतः डॉक्टर असणारे श्रीकांत शिंदे दिव्यातील प्रशस्त हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, पाणीप्रश्न, क्रिडांगण तसेच मैदान, खेळाचे मैदान असा अजेंडा घेऊन उभे राहिले असून संसदरत्न पुरस्कार प्राप्त, ८०% लोकसभेत उपस्थिती असणारे, संसदेत १२ पेक्षा जास्त विधेयक मांडणारे तसेच ५०० पेक्षा जास्त चर्चेत सहभाग घेणारे व राममंदिर मुद्दा मांडणारे अनुभवी उमेदवारालाच साथ द्या व विरोधकांवर सडकून टीका करणाऱ्या शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे यांनी दिव्यातील चौकसभेत मतदारांना आवाहन केले. प्रसंगी महायुतीचे शैलेश पाटील, दीपाली भगत, अमर पाटील, आदेश भगत, भालचंद्र भगत, उमेश भगत, तुषार पाटील, विजय भोईर, चंद्रसेन यादव, समीर चव्हाण, तुषार गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.