लोकल रेल्वे आपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १९ मे : दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान स्थानिक नागरिक रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना लोकलने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.
दुसरी घटना सुनील चव्हाण हा तरुण १३ मे रोजी आईसबोत मुंबईतील नातेवाइकांकडे जात होता. कल्याणमधून दुपारी १.३० वाजताची लोकल पकडली. सुनील दरवाजाजवळ थांबला होता. डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान खांबाची धडक बसल्याने तो ट्रेनमधून खाली पडला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पाच दिवस त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत उल्हासनगर येथे राहणाऱ्या पद्मनन्ना पुजारी (५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते. दररोज उल्हासनगरमधून रेल्वेने प्रवास करणारे पद्मन्ना शुक्रवारी संध्याकाळी लोकलमधून नेहमीप्रमाणे प्रवास करीत होते. लोकलने कल्याण स्टेशन सोडल्यानंतर संध्याकाळी ७.४५ दरम्यान उल्हासनगरमध्ये उतरण्यासाठी ते लोकलच्या दरवाजात थांबलेले. मात्र त्या वेळी मागून आलेल्या रेट्यामुळे त्यांचा तोल गेल्याने विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरदरम्यान ते लोकलमधून खाली पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पद्मन्ना यांना रेल्वे पोलिसांनी तातडीने उपचारासाठी उल्हासनगरमधील सेंट्रल रुग्णालयात दाखल केले मात्र अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.