दिव्यात शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांच्यातर्फे साखर वाटप.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १० जून : शिवसेना दिवा शहरप्रमूख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या वाढदिसानिमित्त दिवा उपशहरप्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने साखर वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख मढवी यांच्या वाढदिवस प्रसंगी आचारसंहिता लागू असल्या कारणाने आज रवीवार दिनांक ९ जून २०२४ साखर वाटपाचा कार्यक्रम दिवा पश्चिम येथील बंदरआळी भागात शिवसेना कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन साखर वाटप कारण्यात आली. प्रसंगी दिपक भगत, नंदकिशोर धुरी, जयेंद्र भगत, अनील लाड, प्रसाद धूरी, प्रथमेश लबदे, प्रसाद नाईक, किरण भगत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.