दिव्यात ५० हजारांची खंडणी प्रकरणी दोघांना अटक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ५ जुलै : दिवा शहरात बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालीकेत तक्रार करण्याची धमकी देवुन ५० हजारांची खंडणीची मागणी करणाऱ्या दुकलीला खंडणीची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडून केली अटक करण्यात आली.
तक्रारदार गणपत म्हात्रे रा. दातीवली ठाणे यांनी इसम नामे गोवर्धन पाटील, रा डोंबीवली व त्याचे सहकारी सन्नी, जितू वाघमारे हे मिळुन ते मुंब्रादेवी परिसरात करीत असलेल्या इमारतीचे बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालीकेत तक्रार करण्याची धमकी देवुन तकार न करण्यासाठी ५० हजारांची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचे धमकीला घाबरून तकारदार गणपत म्हात्रे यांनी गोवर्धन पाटील व त्याचे सहकारी यांना २०,०००/- रूपये दिले होते. परंतू गोवर्धन पाटील हा वारंवार उर्वरीत ३०,०००/- रूपयाची मागणी करीत असल्याने तकारदार यांनी मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे यांचे कार्यालयात तक्रार अर्ज दि. २८/०६/२०२४ रोजी केला होता.
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मालोजी शिंदे यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या इसमांना खंडणीची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यासाठी दि. ३ जुलै रोजी सापळा लावून दुपारी १३ :५० वा दिवा प्रभाग समिती कार्यालयाजवळ, खर्डी गाव, ठाणे येथे आरोपी १) गोवर्धन हनुमान पाटील, वय ४१ वर्षे, २) गणेश सुधाकर शिंपी उर्फ सन्नी वय ४० वर्ष यांना ३०,०००/- रूपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. असून त्यांचे विरोधात तकादार गणपत म्हात्रे यांचे तकारीवरून शिळडायघर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ३०८(३), ३०८(४), ३०८ (५) प्रमाणे दिनांक ०३/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना दिनांक ०९/०७/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.