⭕ब्रेकिंग ; मुंब्रा डोंगरावर रात्री अडकलेल्या पाचही लहान मुलांना वाचविण्यात यश.
संतोष पडवळ
ठाणे, दिवा ता ६ जुलै : काल रोजी ८ : २० वाजताच्या सुमारास खडीमशिन रोड, मुंब्रा बायपास, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी सुमारे ४ :०० वाजताच्या सुमारास खडीमशिन रोड, दर्ग्याच्यावरील डोंगरामध्ये ( सुमारे ३०० फूट उंच) ०५ मुले गेली असता त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्याने तेथेच अडकली होती. *सदर घटनास्थळी मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. वाय. एम. तडवी सो. मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी श्री.दिवटे सो. व खेताडे सो., मा. माजी विरोधी पक्ष नेते श्री. शानू पठाण सो., स्थानिक लोकप्रतिनिधी श्री. शमीन खान सो., अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह, मुंब्रा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान (TDRF टीम) ०१- बस वाहनासह, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुशांत कुमार सेटी व जवान (NDRT टीम), मुंब्रा पोलिस कर्मचारी व गिर्यारोहक श्री. योगेश सद्रे व टीम उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची माहिती पुढीलप्रमाणे :-
*१)* कु. असहदुल पिंटू शेख. (पु./वय- १२ वर्षे, राहणार- दर्गा गल्ली, मुंब्रा, ठाणे.)
*२)* कु. मोहम्मद पिंटू शेख. (पु./वय- ११ वर्षे, राहणार – दर्गा गल्ली, मुंब्रा, ठाणे.)
*३)* कु. ईशान पिंटू शेख. (पु./वय- १० वर्षे, राहणार – आझाद नगर, मुंब्रा, ठाणे. )
*४)* कु. मुन्ना अमन शेख. (पु./वय- ०९ वर्षे, राहणार- दर्गा गल्ली, मुंब्रा, ठाणे.)
*५)* कु. अमीर बाबू शेख. (पु./वय- ११ वर्षे, राहणार- कौसा पेट्रोल पंप, मुंब्रा, ठाणे.)
सदर घटनास्थळी डोंगरामध्ये घसरन भाग, पाऊस, दाट अंधार या सर्व कठीण परिस्थिती मधून अडकलेला मुलांची मध्यरात्री ०३:०० वाजता, सुमारे ०७:०० तासाच्या अथक प्रयत्नांनंतर श्री. वाय. एम. तडवी सो. (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी), व मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी श्री.दिवटे सो व खेताडे सो., तसेच अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, (TDRF टीम) ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व (NDRF टीम) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व गिर्यारोहक यांनी सुखरूप सुटका केली असून सदर मुलांना मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले व त्यांच्या कडून मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.