दिव्यात शिवसेना युवती सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
संतोष पडवळ
ता ९ जुलै
दिवा शहरातील दहावी आणि बारावी परीक्षा मध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना दिवा शहरप्रमुख मा.श्री रमाकांत मढवी साहेब यांच्या मार्गदर्शना ने दिवा शहर युवती सेना शहर अधिकारी कु साक्षी मढवी यांच्या वतीने आकांक्षा हॉल दिवा पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच दिवा शहरातील शैक्षणिक संस्थापक व शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जेष्ठ नगरसेवक व उपशहरप्रमुख शैलेश पाटील, आदेश भगत, गणेश मुंडे, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख शशिकांत पाटील, गुरुनाथ पाटील, चरणदास म्हात्रे, भालचंद्र भगत, राजेश पाटील, जगदीश भंडारी उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व इतर पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवसेना उपशयाप्रमुख ॲड आदेश भगत व युवती सेना शहर अधिकारी साक्षी मढवी यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना दिवा शहर हे नेहमीच दिव्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते, शिवसेनेच्या माध्यमातून दहावी सराव परीक्षा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, करियर मार्गदर्शन असे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असल्याचे साक्षी मढवी यांनी बोलताना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही शैक्षणिक अडचण निर्माण झाल्यास व करिअर संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास युवती सेना आपल्यासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन कुमारी साक्षी मढवी यांनी केले