अखेर दिव्यातील तलावांची प्रदूषण विभागाकडून पाहणी
ठाणे, दिवा ता ११ जुलै – तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा शहर हा अपवाद ठरला होता दिव्यातील तलाव हे मृत अवस्थेत होते तलावामध्ये संपूर्ण कचरा टाकण्यात येत होता ड्रेनेजचे घाण पाणी तलावत जात होते या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आवाज उठवला होता व प्रशासनाला धारेवरती धरले होते याचीच दखल घेऊन प्रदूषण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिवा दौरा करून दिव्यातील दिवा तलाव, दातिवली तलाव,आगासन तलाव या तलावाची पाहणी करून हे तलाव तातडीने साफ करण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले आहेत व दिवा स्टेशन लगत असलेला तलाव हा दोन दिवसात संपूर्ण स्वच्छ करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. यावेळी मनीषा प्रधान व त्यांचे अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे युवा अधिकारी अभिषेक ठाकूर उपविभाग प्रमुख योगेश निकम विकास इंगले आधी उपस्थित होते