ब्रेकिंग ; दिव्यात बेडरूम मधील प्लास्टर पडून दोघे जखमी.
संतोष पडवळ
ठाणे, दिवा ता १४ जुलै :
दिनांक १४/०७/२०२४ रोजी पहाटे ०४:३० वाजता केटी कॉम्प्लेक्स, दिवा पूर्व, दिवा ठाणे याठिकाणी नवीन प्लाझा (तळ+७ मजली, अनधिकृत इमारत/ ०८ ते १० वर्षे जुने बांधकाम) या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रुम नं. ७०४ (मालक – श्री. अरुण सिंग) मधील बेडरूम छताचे प्लास्टर पडले होते. सदर ठिकाणी दोन व्यक्तींना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेत श्री. अंकित सिंग( पु/ वय २८ वर्षे) यांच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
श्रीमती. सोनम सिंग (स्त्री/२६ वर्ष) त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.