दिव्यात आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज महिलांचा मूक मोर्चा.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ता ५ ऑगस्ट २०२४
ठाणे, दिवा ता ५ : आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे यांच्या नेतृत्वात दिव्यात मूक मोर्चा काढण्यात आला. नवी मुंबईतील अक्षदा म्हात्रे व उरण येथील यशस्वी शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन व सकल हिंदू समाज यांच्यावतीने आज आगासनगाव ते दिवा पोलीस चौकी येथे मूक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांवर होणारे अत्याचार हे थांबले पाहिजेत महिलांना संरक्षण मिळाले पाहिजे आज दिवा विभागात पाच लाखाच्या लोकसंख्या आहे परंतु येथे पोलिसांची संख्या फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे दिव्यात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. अक्षदा म्हात्रे व यशश्री शिंदे यांच्याप्रमाणे दिव्यातील कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ नये याची सावधानता पोलिसांनी बाळगावी यासाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला होता असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषा मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खेतले यांना प्रतिष्ठान वतीने निवेदन देण्यात आले यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उषाताई मुंडे, उपाध्यक्ष रंजना तांडेल, दीपिका मुंडे, पूनम मुंडे, प्रिती पाटील, ज्योती म्हात्रे, भारती म्हात्रे, योगिता मुंडे, सविता वायले, सोनम मुंडे तसेच आगासनगाव संघर्ष समिती अध्यक्ष रोहिदास मुंडे, सदस्य मूर्ती मुंडे, शनिदास पाटील, प्रवीण उतेकर, दीपक उतेकर, राजश्री मुंडे, योगेश निकम, प्रियाताई ठाकूर, रेश्मा पवार, सपना भगत, अमृता सिंग, रेश्मा तांबळे आदी शेकडो महिला उपस्थित होत्या.