दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी सह्यांची मोहीम.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १० ऑगस्ट : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखांच्यापुढे गेली असून कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व सध्या पोलिसांवर होणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे यासाठी भव्य सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली आहे. “ऐक सही आपल्या सुरक्षित भविष्यासाठी, ऐक सही आपल्या दिव्यासाठी, स्वतंत्र दिवा पोलीस ठाण्यासाठी म्हणून दिवा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष्याच्या महिला दिवा संघटिका ज्योती पाटील यांनी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी दिवा रेल्वे स्टेशन जवळ केले असता दिवेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
स्वतंत्र दिवा पोलीस ठाणे सह्यांची मोहिमेस अनेक मान्यवरांनी आपली उपास्थिती लावली. प्रसंगी मा. आमदार सुभाष भोईर, वैशालीताई दरेकर, सचिन पाटील, रोहिदास मुंडे, संभाजी जाधव, उमेश राठोड, राजेश भोईर, योगिता नाईक, स्मिता जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.