ठाण्यात आधार सहकारी पतपेढीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ११ ऑगस्ट : आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ११ ऑगस्ट रोजी नुरी हॉल, मखमली तलाव, चंदनवाडी, ठाणे येथे अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. प्रसंगी संस्थेची अद्यावत स्थिती, पाच शाखांचे ८२१९ सभासद संख्या, संस्थेचे खेळते भांडवल ११६ कोटी, संमिश्र व्यवसाय १६० कोटी व निव्वळ नफा १-१५ कोटी झाला असून संस्थेने “अ” वर्ग राखला आहे. प्रसंगी इतिवृत मंजूर करणे, लेखापरीक्षण करणे, दिलेली व वसूल कर्जे, संस्थेचा नफा व तोटा तसेच यावेळी १२% लाभांश मंजूर करण्यात आला.आठ हजार पेक्षा जास्त सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस मा. आमदारांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांचा अध्यक्ष भरतशेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थित संचालकांकडून सन्मान करण्यात आला.
प्रसंगी मा. आमदार बाळासाहेब दांगट (जुन्नर), अँड मा श्री दिनेश पैठणकर साहेब नायब तहसीलदार ठाणे , प्रदीप शिंदे, किसनराव भोसले, तानाजी पानसकर, चंद्रकांत उंडे, ह भ प चंद्रकांत डुंबरे, संतोष मुळे, दादाभाऊ रेपाळे, अँड भाऊसाहेब शेळके, अँड विजय वाघमारे,सौ शोभा वामन मॅडम, टी डी सी बँक मॅनेजर मृणाल मॅडम यासह अनेक ठेवीदार व सभासद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर सर्व सभासदांसाठी रविवारी १८-०८-२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता शुभश्री हॉल, अहिनवे वाडी फाटा, कल्याण नगर हायवे,ओतूर येथे सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावा आयोजीत केल्याची माहिती अध्यक्ष साहेबांनी दिली तदनंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, त्यानंतर संस्थे तर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला..