दिव्यात जेष्ठ नागरिक नागरिक ओळख पत्र शिबिर संपन्न.
ठाणे, दिवा ता ११ ( संतोष पडवळ ) महाराष्ट्र शासन अंतर्गत शासन आपल्या दारी योजने अंतर्गत दिव्यात ज्येष्ठ नागरिक ओळख पत्र दोन दिवशीय शिबिर दिव्यातील गणेश पाडा शिवसेना शाखा व दातिवली शाखा येथे मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे व विभागप्रमुख चरणदास म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला परिणामी जेष्ठ नागरिकांना सदर सेवा दिव्यातच उपलब्ध करून दिल्याने जेष्ठ नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान मा.नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे व विभागप्रमुख चरणदास म्हात्रे यांनी दिव्यात राबविल्याने याचा लाभ दिव्यातील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. सर्व प्रशासन या योजनेची माहीती “हर घर दस्तक” मोहीमेच्या माध्यमातून प्रत्येकाला देणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणखी इतर सुविधा कशा प्रकारे उपलब्ध होतील याचा देखील आढावा घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी सौ. दर्शना म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले. प्रसंगी राजेश पाटील, महेश पाटील, संतोष देसाई, शंकर पाटील यांचसह शिबिरास मा. नगरसेवक दिपक जाधव, गणेश मुंडे तसेच दिवा शिवसेनेसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.