उघड्यावरील अन्नपदार्थ विकणाऱ्यामुळे दिवेकरांचं आरोग्य धोक्यात.
उघड्यावरील अन्नपदार्थ विकणाऱ्यामुळे दिवेकरांचं आरोग्य धोक्यात.
पायाने समोसा पीठ मळणाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २६ ऑगस्ट : ऐन पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ विकणाऱ्यामुळे दिवेकरांचं आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषधं प्रशासनाने पूर्व सूचना देऊन देखील अनेकांचे बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाल्याशिवाय जिभेचे चोचले पूर्ण होत नाही परंतू बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाल्यामुळे आपल्या जीवितास हानी निर्माण होऊ शकते याचेच उदाहरणं दिवा शहरात उघडकीस आले आहे. परिणामी दिवा (मुंब्रा ) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगाराला असून सदर आरोपी वर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलोनी रोडवर पदपथावर समोसा विक्रेता आहे समोसा बनविण्यासाठी लागणारे पीठ कोणतीही स्वच्छतेची काळजी न घेता पायाने तुडवून मानवी आरोग्यास अपायकारक ठरतील असे समोसे बनवत असल्याचे आढळून आले आहे. सदर समोसे मानवी आरोग्यास धोकादायक असल्यामुळे रोहित मौर्या, योगलक्ष्मी अपार्टमेंट, B-603 मुंब्रादेवी कॉलोनीरोड याच्या विरोधात BNS 275 नुसार दिवा (मुंब्रा ) पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास दिवा (मुंब्रा) पोलीस करत आहेत.