दिवा, दातीवली येथील न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल मध्ये चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ता ३१ ऑगस्ट २०२४
ठाणे : दिव्यातील गॉड गिफ्ट फाऊंडेशन ट्रस्टचे दिवा, दातीवली येथील न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल या शाळेत नर्सरी ते मोठ्या शिशू विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व सफेद दिवस साजरा करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे काढली तर सर्व विद्यार्थी पांढरे शुभ्र पेहराव करून आले होते. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे संचालक श्री प्रेमनाथ म्हात्रे उपस्थित होते.