Spread the love

ब्रेकिंग ; पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरची गोळ्या घालून हत्या.

संतोष पडवळ – प्रतिनिधी

पुणे ता २ सप्टेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आज त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. पुण्याच्या के इ एम रुग्णालयात त्यांना नेले असता तिथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदेकर यांची अशा पद्धतीने हत्या झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हा चिंतेचा विषय होणार आहे राष्ट्रवादी पक्षाकडूनउमेदवारी मिळवून वनराज आंदेकर हे २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते . नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांची अत्यंत शांत नगरसेवक अशीच गणना होत होती, आज नाना पेठेत त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करून ४ ते ५ जन पळून गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!