शिक्षकदिनी पांडुरंग होले यांना जिल्हास्तरीय शिक्षक समाजभूषण पुरस्कार प्रदान.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, डोंबिवली ता ५ सप्टें : प्रकट महाराष्ट्र संस्थाद्वारे यंदाचा जिल्हास्तरीय शिक्षक समाज पुरस्कार डोंबिवली पश्चिम येथील गावदेवी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक श्री पांडुरंग होले यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त समाज भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोकण सामाजिक विकास संस्था व प्रकट महाराष्ट्र वृत्तवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिक्षक समाजभूषण पुरस्कार श्री शिक्षण महर्षी केशव भोईर गावदेवी विद्यामंदिर संस्था अध्यक्ष तसेच पेंढारकर कॉलेजचे ब्रह्मानंद सर, ढोकळे सर व रोटरी क्लबचे पदाधिकारी यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्काराने शिक्षक श्री पांडुरंग अर्जुन होले यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. गेली २५ वर्षापासून न्यानदानाचे काम करणारे होले सर यांचे त्यांच्या सहकारी शिक्षकांसह नातेवाईकांनी कौतुक व आनंद व्यक्त केला आहे.