Spread the love

भाजप युवा मोर्चाचे सतिश केळशीकर आक्रमक

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ६ सप्टेंबर : दिवा पश्चिम येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. गळके छप्पर असलेल्या व अस्वच्छता असल्याने स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांचे गैरसोय होत आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीची डागडूजी करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात होती. या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर झाला, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते मात्र सदर कामात अडथळा का ? व कश्यामुळे निर्माण झाला आहे असे भाजप युवा मोर्चाचे सतिश केळशीकर यांनी सवाल केला आहे.

दिवा पश्चिम येथील या स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणाऱ्या मृतदेहासह अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाईग्रस्त दिव्यात स्मशानभूमीत देखील पुरेसं पाणी उपलब्ध नसल्याने तसेच सरणावरच्या चौथऱ्यावर गळक्या छप्परमुळे ठेवण्यात आलेल्या लाकडावर प्लास्टिक कागद टाकून ते झाकण्यात येत आहे हा प्रकार पाहून त्याबद्दल केळशीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवेकरांसाठी सदर लाजिरवाणी बाब दिसून येते असून अनेक जेष्ठ नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. प्रकरणी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व ठाणे महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी दर्शवली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!