ब्रेकिंग ; दिव्यात घरगुती वादातून पतीकडून पत्नीची हत्या.
संतोष पडवळ, दिवा, ठाणे
ठाणे, दिवा ता १५ सप्टेंबर : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट परिसरात पती पत्नीचा कौटुंबिक व घरगुती कारणामुळे पतीने राहत्या घरातच धारदार हत्याराने पत्नीवर वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने मयत पत्नीच्या नातेवाईकास फोनवर कळवून फरार झाला आहे. प्रसंगी घटनास्थळी दिवा (मुंब्रा) पोलीस दाखल होऊन सदर महिलेचा मृतदेह कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पीटलला पाठवला आहे. सदर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त बुरसे, उत्तम कोळेकर सह पोलिस आयुक्त तसेच वपोनि अनिल शिंदे तसेच पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर , दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक के. के. तांबे, वसंत खेतले आणि राजेंद्र तोरडमल आदी पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर होते. प्रकरणी मुंब्रा पोलिस स्टेशन गुन्हा दाखल असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.