दिव्यात दहा दिवसांच्या ७६१ बाप्पाचें विसर्जन तर गणेश घाटावर अनेक मान्यवरांची उपस्थिती.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १७ सप्टेंबर : दिवा शहरातील गणेश तलाव, दातीवली येथे दहा दिवसांच्या ७६१ बाप्पाला जड अंतकरनाने भाविकांनी निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” च्या घोषणानी शहर दुमदूमले तर दिव्यातील दातीवली गणेश विसर्जन तलावा वर ठाणे महानगरपालिकेने सुंदर विसर्जन व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या दहाव्या दिवशीही दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते.
तर कायदा आणी सुव्यस्थाच्या दृष्टीने मुंब्रा (दिवा) पोलिसांचा कडक बंदोबस्त होता प्रसंगी ठाणे पोलीस सह आयुक्त उत्तम कोळेकर यांनी उपस्थिती लावली प्रसंगी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह सपोनि राजेंद्र तोरडमल, अमोल कोळेकर, के के तांबे हे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विसर्जन घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच आपत्ती व्यवस्थापनचे जवान तैनात करण्यात आले होते. दिवा शहरातील पोलीस मित्र टीम गेली दहा दिवसापासून तैनात होती.
गणपती विसर्जन मिरवणूकीत दिवा शिवसेनेतर्फे गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती तर भाविकांसाठी अल्पउपहाराची सोय देखील करण्यात आली होती. सदरच्या नियोजनबद्ध ठाणे मनपाच्या यंत्रणेचे शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी व भाजपचे दिवा-शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी कौतुक व आभार मानले.