अक्षय मेहरे भारतीय यांच्या हस्ते जळगांव स्पोर्टिंग क्लब तर्फे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव, ता 12 नोव्हे (प्रतिनिधी) : अक्षय मेहरे भारतीय यांच्या हस्ते जळगांव स्पोर्टिंग क्लब तर्फे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जळगांव स्पोर्टिंग क्लब तर्फे दरवर्षी भव्य कब्बडी सामन्याचे आयोजन करण्यात येते. कोविड ची लाट ओसरल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या पातळीवर सामन्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून अक्षय मेहरे भारतीय यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की खेळाडूने भारतीय बनून खेळले पाहिजे. भारतीय खेळ हे शरीरासोबतच मनाला बळकट करते. हल्लीच्या काळात मोबाईल मुळे मुलं मैदानी खेळापासून दूर गेले आहे. तरुणाला बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनायचे असेल तर पुस्तकांशी मैत्री आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम बनायचे असल्यास मैदानी खेळाशी मैत्री करावी असे ते याप्रसंगी बोलले. तरुणांनी फक्त स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाच्या दिवशीच देशभक्ती न दाखवता संपूर्ण वर्षभर देशाला आपल्या ह्रुदयात ठेवावे व आपल्या नावाबरोबर भारतीय शब्द जोडावा असा सर्वांना संदेश दिला. यावेळी उपस्थितांना भारतीयतेची शपथ देण्यात आली.
यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे मनेजर श्री रोमिजी भिंडर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की खेळाचा सातत्याने अभ्यास करणाऱ्या खेळाडूलाच खेळात यश मिळते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूला शुभेच्छा दिल्या. यानंतर श्री आशिषजी गजभिये ठाणेदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि खेळाडूंना मार्गदर्शन केले.
सुरेशराव इंगळे अध्यक्ष श्री शिवाजी क्रीडा मंडळ जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेला अतिथी म्हणून अनील भाऊ माळवी(अंतराष्ट्रीय कब्बडी खेळाडू), अनीलराव गोहाड, A.D. चर्जन, राजेंद्र जी तसरे, नामदेवजी डफर, अशोकराव जी धुळे, शरदराव वानखेडे, रमेशराव मोदीमहात्मा होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा राष्ट्र परिषदेचे अध्यक्ष श्री राजेन्द्रजी माकोडे, मनोजजी पन्नासे, राजेंद्रजी डहाके व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.