भिवंडीच्या पोलीस उपायुक्तपदी श्री नवनाथ ढवळे यांची नियुक्ती
ठाणे, ता 14 नोव्हे (प्रथमेश तांबे) : भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांचा पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची प्रशासकीय आदेशानुसार शासकीय बदली झाली असून त्यांच्या जागी नवनाथ ढवळे यांची भिवंडी परिमंडळ २ पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस परिमंडळ-२ चे पूर्व विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, पश्चिम विभागाचे एसीपी सुनील वडके यांच्या सह विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांनी त्यांचे – पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून स्वागत केले आहे. नवनाथ ढवळे हे शहापूर येथे ठाणे ग्रामीण उप अधिक्षक पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाने त्यांची पदोन्नती केल्यामुळे ते पोलीस उपायुक्त म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात हजर झाले. यावेळी शासन आदेश व ठाणे पोलीस आयुक्त जय जीत – सिंह यांच्या आदेशानुसार भिवंडी पोलीस उपायुक्त म्हणून नवनाथ ढवळे यांचे नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी मान्यवरांनी त्यांचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.