दीड हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी व खासगी इसम ACB च्या जाळ्यात
ठाणे,काशिमीरा ता 16 नोव्हे (संतोष पडवळ) : दीड हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी व खासगी इसम ACB च्या जाळ्यात अडकला आहे. लोकसेवक पो.शि/ बांगर यांनी तक्रारदार यांचे नव्याने चालु केलेले हॉटेल (ढावा) सुरु ठेवणेकरीता तसेच रात्री उशिरा पर्यंत चालू ठेवण्याकरीता ५ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक १५/११/२०२२ रोजी लोकसेवक पोशि/ श्री. रामचंद्र यशवंत बांगर यांची तक्रारदार हे काशिमिरा पोलीस स्टेशन येथे येवुन समक्ष भेट घेतली असता, लोकसेवक पोशि/ श्री. बांगर यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती १५००/- रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने लागलीच आज दि. १५/११/२०२२ रोजी काशिमिरा पोलीस स्टेशन येथे सापळा आजमाविला असता, सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लोकसेवक पोशि/ श्री. बांगर यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याकरीता समक्ष भेटले असता, लोकसेवक पोशि/ बांगर यांनी काशिमिरा पोलीस स्टेशनचे समोरील रोडचे बाजूस असलेल्या चहा टपरीवाल्याकडे १५०० /- रुपये लाचेची रक्कम देणेबाबत तक्रारदार यांना सांगितले.
त्यानुसार तक्रारदार यांनी चहावाल्याकडे १५००/- रु. लाचेची रक्कम दिली असता. नमुद चहाचे टपरीवरील श्री. श्याम चंदेश्वर पंडीत यांनी १५००/- रु. लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारले असता श्री. श्याम पंडीत यांना १२:५० वा. रंगेहात पकडण्यात आले आहे.. तसेच लोकसेवक पोशि/ बांगर यांना काशिमिरा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी कक्षामधुन १३:०० वा. ताब्यात घेतले आहे. सदरबाबत गुन्हा नोंदविण्याची कारवाई काशिमिरा पोलीस स्टेशन येथे सुरु
तपास अधिकारी : सौ.अश्विनी संतोष पाटील. पोलिस उप अधिक्षक,
पोहवा/महाडिक , मपोहवा/शिंदे, पोना/पाटील, चा पो हवा/ शिंदे तसेच मा.श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र,श्री.अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र