ठाण्यात बेवारस वाहनांवर ठाणे मनपाची कारवाई.
ठाणे, ता 16 नोव्हे (संतोष पडवळ) : स्वच्छतेच्या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने बेवारस गाड्या उचलण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत, वागळे इस्टेट परिसरातून ३२ आणि कोपरी मधून १९ बेवारस वाहने उचलण्यात आली आहेत. त्यात जुन्या रिक्षा, छोटा हत्ती टेम्पो, दुचाकी गाड्या आणि गाड्यांचे सांगाडे, चारचाकी हातगाड्या यांचा समावेश आहे.
या भागाचे सर्वेक्षण केल्यानंतर जी वाहने बेवारस स्थितीत आढळली त्यांच्यावर नोटिसा लावण्यात आल्या. नोटीसची मुदत संपल्यावर या गाड्या उचलण्यात आल्या, असे परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितले.