विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त करून देशाच्या उत्कर्षास हातभार लावावा – मा. आमदार रमेश कोरेगावकर
मुंबई, ता 21 नोव्हे (दीपेश मोरे) : मुंबईतील पराग विद्यालय भांडुप येथील डिजिटल बोर्डसहित १०० संगणक आणि ४ प्रिंटर यांनी सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन आमदार रमेश कोरगांवकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आमदार रमेश कोरगांवकर यांच्या आमदार निधीतून शाळेला नऊ संगणक व दोन प्रिंटर भेट दिले गेले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पराग शैक्षणिक संकुलाला भेट दिली. शाळेच्या सुसज्य विज्ञान प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, परिपूर्ण वाचनालय, A.V. रूम यांची व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार रमेश कोरगांवकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, भांडुप सारख्या उपनगरातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी एकमेव मराठी शाळा म्हणजे पराग विद्यालय. यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची आमदार कोरगावकर यांनी प्रशंसा केली. विद्यार्थ्यांना या सर्व सुविधांचा योग्य प्रकारे वापर करून आपले भविष्य उज्वल बनवावे आणि उत्तम शिक्षण प्राप्त करावे व देशाच्या उत्कर्षास हातभार लावावं असा मौलिक सल्ला देखील कोरगावकर यांनी यावेळी उपस्थितांना दिला. विद्यार्थ्यांना सर्व सोइ सुविधा देणारी संस्था म्हणून पराग विद्यालय ही एकमेव शाळा ठरेल असा मला विश्वास वाटतो. एक विद्यार्थी एक संगणक हि संकल्पना अस्तित्वात आणणारी सुजाण मराठी शाळा असा उल्लेख महाराष्ट्र कामगार सेना सचिव सुनील चिटणीस यांनी याप्रसंगी केला. या सोहळ्याकरिता महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने सचिव माजी आमदार डॉ.सुभाष बने, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, संस्थेचे संचालक व शिवसेना उपविभाग प्रमुख पराग बने, म्युनिसिपल कामगार सेना सचिव सुनील चिटणीस, माजी नगरसेवक शिवसेना उपविभाग प्रमुख सुरेश शिंदे व उमेश माने, शिवसेना महिला विभागप्रमुख. सुनंदा वाफारे व संगीता पेडणेकर,शाळेचे मुख्याध्यापक सी.एम.भारंबे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका पृथा बने इत्यादी मान्यवर तसेच पालक, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.