दिव्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवा व गतिरोधक बसवा- विकास इंगळे, शिवसेना (ठाकरे गट)
ठाणे, दिवा, ता 21 नोव्हे (संतोष पडवळ) : दिव्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास प्रकाश इंगळे आक्रमक झाले असून दिवा स्टेशन मुंब्रा देवी कॉलनी रोड वरील खड्डे बुजवून ताबडतोब दुरुस्त करा. तसेच दिवा स्टेशन ते दिवा आगासंन रोड वरती तत्काळ गतिरोधक बनवा अशी मागणी दिवा प्रभाग समितीकडे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रोडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.पालिका प्रशासन,स्थानिक लोकप्रतिनिधी यांना यांचे याकडे जराही लक्ष नाही.पालिका प्रशासनाने मुंब्रा देवी कॉलनी येथील रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून घ्यावा.तसेच दिवा आगासन रोड वरती अनेक शाळा आहेत.परंतु वाहन चालक भरधाव वेगाने गाड्या चालत असतात.त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहेत.काही अपघात झालेही आहेत.त्यामुळे नागरिकांच्या साठी,शालेय विद्यार्थ्यांच्या साठी सदर रस्त्यावर गतिरोधक बनवण्यात यावेत अश्या प्रकारचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास प्रकाश इंगळे यांनी सहाय्यक आयुक्त साहेब दिवा प्रभाग समिती यांना दिले.