संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने अभिवादन
मुंबई, ता २१ नोव्हेंबर, ( किशोर गावडे ) : बंधुत्व फाउंडेशन तर्फे २१ नोव्हेंबर रोजी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतील १०७ हुतात्मांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज. दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, विजय रणदिवे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या पदाधिकारी कल्पना देसाई, बंधुत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस किरण फडणीस, पदाधिकारी विजय काशिलकर, गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आलेले संजय तावडे, पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते शशी नाईक, सुधिर मुंज, मधु कोळी, हरिश्चंद्र सावंत, अनिल चव्हाण, बंड्या तावडे इत्यादी उपस्थित होते. बंधुत्व फाउंडेशनचे हे सामाजिक कार्य २००३ सालापासून आजतागायत सातत्याने चालू आहे.
21 नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
बंधुत्व फाउंडेशन तर्फे २१ नोव्हेंबर रोजी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतील १०७
हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली