राज्यपालांचं बेताल व्यक्तव्ये व पोलीस भरती संदर्भात भारतीय मराठा संघांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
ठाणे, ता 22 नोव्हे (संतोष पडवळ) : भारतीय मराठा संघाच्या वतीने आज जिल्हाधीकारी व तहसिलदार कार्यालय ठाणे येथे, खालील विषयांकरीता निवेदन देण्यात आले.
१. मराठा आरक्षणाबाबतीत तोडगा निघत नाही तो पर्यंत शासनाच्या अखत्यारीत असलेल्या १०५ घटना दूरुस्ती कलमाखाली घेण्यात येणारी पोलीस भरती सध्या तात्पुरती थांबवण्यात यावी. कारण यामुळे सध्या होणार्या १६००० पोलीस भरतीमधील किमान २००० मराठा तरुण यापासुन वंचीत राहतील.
२. सध्याचे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेळोवेळी केलेली बेताल व्यक्तव्ये, छत्रपती शिवराय, महापुरुष, राष्ट्रीय माता यांचा वेळोवेळी होत असलेल्या अवमानाच्या व बेजबाबदार व्यक्तवांच्या निषेधार्थ त्यांनी महाराष्र्टातील तमाम जनतेची माफी मागुन, केंद्र सरकारने त्यांची तात्काळ बदली करावी.
अन्यथा महाराष्ट्रातील तमाम जनता रस्त्यावर ऊतरुन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे भारतीय मराठा संघ अध्यक्ष श्री. अविनाशजी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना वरील दोन्ही विषयावर मागणी व निषेध व्यक्त केला.
प्रसंंगी भारतीय मराठा संघ अध्यक्ष श्री.अविनाशजी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना वरील दोन्ही विषयावर मागणी व निषेध व्यक्त केला. तसेच मराठा संघ यापुढे मोठे अांदोलन ऊभे करेल. यावेळी प्रदेश ऊपाध्यक्ष श्री.दिपक पालांडे, सौ.अनघा जाधव, प्रदेश सचिव अार्कीटेक श्री.एस.डी.पाटील, श्री.महेश महापदी, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश पाटील सर, ठाणे महानगर संपर्कप्रमुख श्री.अरुण फणसे, ठाणे शहर अध्यक्ष श्री.ऊमेश गोगावले, महीला अाघाडी ठाणे शहर अध्यक्षा सौ.ऊषाताई केंजले विभागप्रमुख श्री.राकेश मोरे व पत्रकार बांधव अादी पदाधीकारी ऊपस्थीत होते.