दिव्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन.
ठाणे, दिवा. ता 22 नोव्हे (संतोष पडवळ) : बहुजन समाज पार्टी दिवा शहराच्या वतीने दिवा डम्पिंग येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येची साठी काही महिन्यांपूर्वी प्रभाग समितीवर “जल आक्रोश मोर्चा” काढण्यात आला व दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त श्री.फारुख शेख व दिवा पाणीपुरवठा विभागाचे श्री.वाघिरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की विभागातील नवीन पाईप लाईनचे काम लवकरच सुरु करणार असल्याचे सांगितले होते व या कामासाठी पाण्याचे पाईप येऊन जवळपास 2 महिने झाले, तरीही पाण्याचे पाईप टाकण्याचे काम सुरु झाले नाही व पालिका प्रशासनाने बोळवण करत उडवा उडवी ची उत्तरे देत एक प्रकारे बहुजन समाज पक्षाची फसवणूक केली आहे व साबेतील रहिवाशांचे पाणी समस्या सोडवण्यात आली नाही अजूनही शेकडो नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत ही संतापजनक बाब असून यामुळे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. संदीपजी ताजने यांच्या आदेशाने 17 नोव्हेंबर 2022 पासून पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरु होईपर्यंत, गणेश मंदिर रोड डम्पिंग येथे, नॅशनल शाळेच्या पुढे, दिवा शिळ रस्त्याच्या पुढे,बहुजन समाज पार्टीच्या वतीने सल्लग एक आठवडा बेमुद्दत धरणे आंदोलन करून परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून द्यावे असाही इशारा दिवा प्रभाग समिती दिला आहे.
अशोक सिद्धार्थ (राष्ट्रीय प्रदेश प्रभारी) मा. नितिनसिंह जाटव को (प्रभारि महाराष्ट् प्रदेश), मा. संतोषजी भालेराव (अध्यक्ष ठाणे जिल्हा) प्रशांत जी इंगले (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी), मा.दिपकभाऊ खंदारे(ठाणे शहर सचिव) मा.नागेशजी जाधव,डॉ.पी.बी गौतम, मा.प्रमोद खांबे,बबनदादा म्हात्रे, उद्याताई दाभाडे, मा. विकास पोहरकर, मा. हंसराज गौतम मा.राम गौतम मा राजेन्द्र जैसस्वार, मा. शैशनाथ भारती,मुकेश जैसवार,नागेश गमरे,पंकज जैस्वार,सुनील पठवा,राहुल कांबळे,संतोष कुमारमौर्य,रमेश गौतम, संदीप गौतम व आदी महिला पुरुष पदाधिकारी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते