दिव्यातून 19 कोटी मालमत्ता कर जमा तर ठाणे मनपाने मालमत्ता करापोटी पार केला 500 कोटीचा टप्पा
ठाणे ता २३ नोव्हे (संतोष पडवळ) : मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी दिल्यामुळे प्रतिसादामुळे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ३५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांचे आभार व्यक्त केले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
*आवाहन : कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे*
प्रभागसमिती निहाय झालेली वसुली
उथळसर– ३४.४३ कोटी
नौपाडा कोपरी – ६३.१४ कोटी
कळवा- १६.९४ कोटी
मुंब्रा – १९.०५ कोटी
दिवा- १९.०३ कोटी
वागळे इस्टेट- १६.५५ कोटी
लोकमान्य सावरकर – १९.१० कोटी
वर्तकनगर – ७७.४६ कोटी
माजिवडा मानपाडा – १७३.९८ कोटी
ठाणे महापालिका मुख्यालय – ६२.४३ कोटी
*एकूण – ५०२.१२ कोटी.*