दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीला ठाणे श्रीनगर पोलिसांकडून शिताफीने अटक

0

ठाणे, ता 24 नोव्हे (संतोष पडवळ) : दि. १९ /११ /२०२२ रोजी पहाटे ०४:५० वा. चे सुमारास श्रीनगर पोलीस स्टेशनचे हृददीत तपास पथकातील सपोउनि माणिक इंगळे, पोशि/ ७०१८.धुत्रे, पो.शि./ २८५० शेडगे, पो.शि. १९२ / साळुंखे असे साध्या वेशात खाजगी मोटार सायकलने रोड नं.१६ कडून रोड नं.१८ एस कडे रात्रगस्त फिरत असतांना रोड नं.१८ येथे वागळे इस्टेट, ठाणे या ठिकाणी एक सिल्वर रंगाची होंडा मोबीलीयो व एक मरुण रंगाची स्विफ्ट डिझायर या वाहनातील इसम १) नवीन चंद्रभान सिंग, वय २६ वर्षे २) चंद्रकांत तिमाप्पा पुजारी, वय – ३८वर्षे ३) विश्वजीत विनोद डांगळे, वय-२३ वर्षे व ४) जुबेर ५) थॉमस डॅनिय व त्यांचे सोबत असलेले दोन साथीदार हे दरोडा घालण्याचे उद्देशाने एकत्र दबा धरून असतांना त्यांना घेराव घालून ताब्यात घेतांना १) जुबेर २) थॉमस डॅनिय व त्यांचे सोबत असलेले दोन साथीदार हे तेथुन पळुन गेले. उर्वरीत वरिल अ.नं. १ ते ३ यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडील दोन चारचाकी वाहनांची झडती घेतली असता एक पांढ-या रंगाची लाल व तपकीरी रंगाची लहान फुलांची डिझाईन असलेली कापडी पिशवी मिळाली त्यात एक मोठा स्कू ड्रायकर, एकुण ४ कटावणी पैकी दोन अडीच फुट लांबीच्या व दोन दिड फुट लांबीच्या, एक मोठा अॅडजस्टेबल पाना व एक लहान अॅडजस्टेबल पाना, एक १०-१२ नंबरचा पट्टी पाना, एक चाकु, चिकटपट्टी, मिरची पुड, एक जोड हॅन्डग्लोज, कापडी मास्क, काळया रंगाची टोपी, वाहनाच्या दोन नंबर प्लेट KA 51 MH 4015 अश्या एकच नंबरच्या असे साहीत्य जवळ बाळगुन दरोडा घालण्याचे उदद्देशाने तयारी केली असतांना मिळुन आल्याचे निष्पन्न झाल्याने सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सर्व आरोपी विरूध्द ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २६३ भा. द.वि. कलम ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयामध्ये आत्तापर्यंत एकूण ०४ आरोपीना अटक करण्यात आले असुन त्यांची दिनांक २४/११/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे. सदर गुन्हयातील आरोपीत कमांक ४) थॉमस यास अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन अजुन एक वाहन जप्त करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!