शिक्षक श्री भानुदास शिंदे मौलाना अब्दुल कलाम आझाद शिक्षणभूषण पुरस्काराने सन्मानित.
मुंबई,मुलुंड ता 25 नोव्हे (दीपेश मोरे): दैनिक झुंजार केसरी या लोकप्रिय वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या गुणिजन मानकऱ्यांमध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा मानला जाणारा मौलाना अब्दुल कलाम आझाद शिक्षणभूषण पुरस्कार वामनराव मुरांजन कनिष्ठ महाविद्यालय मुलुंड येथील तंत्रस्नेही शिक्षक भानुदास शिंदे यांना मिळाला. सकृत खांडेकर व विलास खानविलकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे यांना गौरविण्यात आले. शिंदे यांच्या उत्कृष्ट अशा सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शाबासकीची थाप टाकली आहे. दैनिक झुंजार केसरी वर्धापन दिन दैनिक प्रहार संपादक सकृत खांडेकर ज्येष्ठ कवी विलास खानविलकर डॉक्टर प्रवीण निश्चित दैनिक झुंजार मुख्य संपादक मुनीर खान संपादक अंकुश काटकर आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.