दिव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ आयोजित संविधान दिनानिमित्त भव्य रॅली.
ठाणे, दिवा ता 26 नोव्हे (संतोष पडवळ) : संविधान दिनानिमित्त दिव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ.( एक गाव एक शहर ऐक जयंती एक मिरवणूक) आयोजित भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते व प्रसंगी अध्यक्ष एकनाथ भगत, उपाध्यक्ष दिनेश पाटील तसेच संघटक बालाजी कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी दिवा शहरातील आंबेडकरी समाज, महीला, मुले बहुसंख्येने उपस्थित होते. संविधान आणि त्याचे, फायदे, महत्त्व या बाबत नागरीकांना सजग करणे आणि संविधानाचे महत्त्व पटवून देणे, हे भारतीय नागरीक म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य असुन, आपण सर्व भारतीय नागरीकांनी संविधानाचे पावित्र्य राखले पाहीजे. कारण भारताचे संविधान हे, भारतातील प्रत्येक जाती धर्म, गरीब श्रीमंत हा भेदभाव पाळत नाही. भारताचे सार्वभौमत्व या संविधानावर अवलंबून आहे. म्हणुन जगात भारतीय संविधानाचे स्वागत केले जाते.