सम्यक बुद्धविहार गणेश नगर दिवा पूर्व येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.
ठाणे, दिवा, ता 26 नोव्हे (संतोष पडवळ) : सम्यक बुद्धविहार गणेश नगर दिवा पूर्व येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी संविधान दिनाच्या प्रती उपस्थित सर्वांना वाटण्यात आल्या आजचा दिवसाचे वैशिष्ठ म्हणजे दिवा शहरांमध्ये पहिल्यांदाच संविधानावरती परीक्षा घेण्यात आली यावेळेस परीक्षेला २२ विदयार्थी बसले होते ही खुप अभिमानाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात समाजसेवक श्री भालचंद्र भगत साहेब, श्री प्रविण उतेकर साहेब यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर अध्यक्ष जयसिंग कांबळे साहेब यांच्या हस्ते मेणबत्ती पेटउन करण्यात आल.
या शुभप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते श्री रोशन भगत, नवनीत पाटील, विनायक निंबाळकर, कपिल रोडे, डॉक्टर जाधव, विनोद पाटील सर, निलेश पाटणे, संदेश कदम, भालेराव साहेब, नितिन पंडागळे, रवींद्र आगाणे
,अजित वाघमारे,रूपाली कांबळे, कविता मगरे, प्रशांत घाडगे, रेशमा साळवे, अशोक तांबे, किशोर रोकडे तसेच पत्रकार बंधू आणि मोठ्या प्रमाणात महिलावर्ग देखील उपस्थित होते