जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची वडगाव आनंद या शाळेला भेट
जुन्नर, आळेफाटा ता 26 नोव्हे (संतोष पडवळ) :
जिल्हा परिषद पुणे कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गणले जाणारे मा.श्री.आयुष प्रसाद साहेब (भा.प्र. से.) यांनी जुन्नर तालुक्यातील नावाजलेली जिल्हा परिषदेची वडगाव आनंदच्या शाळेला भेट दिली, भेटीदरम्यान सर्व शाळा, शाळेतील असणा-या सुविधा त्यात शालेय ईमारत, संगणक कक्ष, स्वयंपाकगृह, भोजनालय, हॅड वाॅश स्टेशन, परसबाग, आंब्याच्या बागा आदि बाबींची चौकशी व पाहणी करत मनापासून समाधान व्यक्त केले, मिळविलेल्या सीएसार निधीबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यानच्या काळात शिक्षकांना मार्गदर्शन करत शालेय व्यवस्थापन समितीचे भरभरुन कौतुक केले. शालेय व्यवस्थापन शिक्षणतज्ञ सदस्य श्री.डि.बी.(नाना)वाळूंज यांचे विशेष कौतुक करत श्री.डि.बी.वाळूंज यांनी शाळेसाठी सरंक्षक भिंतीच्या कामासाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन देत वाढता पट लक्षात घेता दोन वर्गखोल्यांची केलेली मागणी देखील लवकरात लवकर देण्याबाबत संकेत दिले. या भेटीदरम्यान नेहमीच शाळेला मार्गदर्शन करणारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा.श्री.शरदचंद्र माळी तसेच पंचायत समितीचे ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता श्री.टोपे, शाखा अभियंता गुजर, बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री.परदेशी. शाखा अभियंता श्री.राजापुरकर, विस्तार अधिकारी श्रीमती बेनके, मोरे, संतोष भुजबळ, मयुरेश वाळूंज गट शिक्षणाधिकारी श्रीमती अभंग मॅडम. केंद्र प्रमुख डुंबरे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सदस्या दिपाली गडगे, जया देवकर, सदस्य सतिश भिंगारदिवे, उपसरपंच संतोष चौगुले, ग्रामसेवक चिखले, शालेय मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, सहशिक्षका वृषाली कालेकर, मनिषा इले, संगीता कुदळे, गौरी डुंबरे तसेच ग्रामसंग समन्वय श्रीमती संगिता तळेकर, अध्यक्ष सविता काशिकेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.