दिव्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे, दिवा ता 27 नोव्हे (संतोष पडवळ) : दिव्यात तरुणाची गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीमधील प्रशांत नगर मध्ये सदर घटना घडली आहे. वैभव लव्हाळे नामक तरुण प्रशांत नगर प्रशांत छाया इमारतीत तिसऱ्या मजल्यावर रहात होता. काल रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली असून आत्महत्या का केली किंवा कोणतीही चीट्ठी आढळून आली नसल्यांचे समजले आहे. सदर तरुणास पत्नी व दोन लहान मुली असून सदर तरुणाचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे. प्रकरणी दिवा पोलिसांकडे सदर घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून दिवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार श्री गवळी करत आहेत.