जेष्ठ मराठी साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
मुंबई ता 30 नोव्हे (संतोष पडवळ) : मराठी साहित्यिक डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन झाले. ग्रामीण मराठी साहित्यामध्ये त्यांचे अनमोल योगदान आहे.ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. ‘राजधानी’, ‘वारसा’, ‘सावित्रीचा निर्णय’ या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत.
याखेरीज ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’, ‘पराभव’ या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावरील ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ देखील त्यांनी लिहिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरु होते.
त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने सामाजिक भान असणारा साहित्यिक व विद्यार्थीप्रिय शिक्षक गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली.