दिव्यात संविधान गुणगौरव स्पर्धा उत्साहात पार.
ठाणे, दिवा ता 30 नोव्हे (संतोष पडवळ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटक सौ. योगिता हेमंत नाईक आणि समाजसेवक हेमंत श्री हेमंत प्रल्हाद नाईक ह्यांनी संविधान गुणगौरव स्पर्धा- २०२२ आयोजन करण्यात आले. ठा. म. पा. मराठी शाळा क्र ९४ मधील विद्यर्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि शालेय उपयोगी भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाला उपशहर प्रमुख सचिन राम पाटील, उपशहर संघटक प्रियांका सावंत , मचींद्रा लाड , स्मिता जाधव, सचिन पारकर , विनया कदम, वैष्णव पाटील , अजित माने , अक्षय म्हात्रे , तुषार सावंत उपस्थित होते