लोकल रेल्वेच्या महिला डब्यात महिला प्रसूत
ठाणे, टिटवाळा, ता 2 डिसें (संतोष पडवळ) : मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान रेल्वेच्या डब्यात महिला प्रसूत झाल्याची घटना घडली असून सदर महिला रुग्णालयात जाण्यासाठी कसाऱ्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रथम वर्गाच्या लोकलच्या डब्यात सौ. प्रिया प्रवीण वाकचौरे ही 33 वर्षीय गरोदर महिला प्रवास करत होती. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने महिला प्रवश्यांचा मदतीने ती लोकल डब्यात प्रसूत झाली असून ती व तिचे बाळ हे दोन्हीही सुखरूप आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानकातील GRP /RPF पोलीस व प्रवाश्यानी सदरील महिलेला तातडीने पुढील मदत पुरवून हॉस्पिटल मध्येही दाखल केले आहे.