दिव्यात वीर हनुमान मित्रमंडळ व समर्थ प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा ; आज अंतिम स्पर्धा
ठाणे, दिवा ता 4 डिसें (संतोष पडवळ) वीर हनुमान मित्रमंडळ आणि समर्थ पतिष्ठान दिवा आयोजित दुर्गानगर दातिवली तलाव येथील तीन दिवशीय भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील सामने रंगतदार होत असून युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.या स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मैदानाच्या चारही बाजूला गर्दी केली आहे.
वीर हनुमान मित्रमडळ आणि समर्थ प्रतिष्ठान दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रतिष्ठीत नागरिक श्री निलेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने भव्य अश्या स्पर्धा दिव्यात भरविल्या गेल्या आहेत. मंडळाचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धांना युवकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.या स्पर्धा 60 किलो वजनी गटासाठी असून आतापर्यंत या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणांहून 32 पुरुष संघांनी सहभाग घेतला आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेत 4 महिला संघांनीही सहभाग घेतला आहे.
या स्पर्धा सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत खेळविण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत 2 डिसेंबर रोजी 16 संघ तर 3 डिसेंबर रोजी 16 असे 32 संघ खेळविण्यात आले आहेत.एकूण रविवारी 4 डिसेंबर रोजी अंतिम सामना होणार आहेत. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक 25 हजार रुपये व चषक,दुसरे पारितोषिक 15 हजार रोख रुपये व चषक,तिसरे पारितोषिक 8 हजार रुपये व चषक व तिसरे 8 हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे.तसेच सर्वोत्तम पकड चषक,सर्वोत्तम चढाई चषक,सर्वोत्तम खेळाडू चषक,सर्वोत्तम लोकप्रिय खेळाडू यांचाही सन्मान केला जाणार आहे.
दिव्यातील मुलंही कब्बडीसारख्या माध्यमातून राज्य,आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावेत आणि चांगले प्राविण्य मिळवावे असा उद्देश असल्याचे आयोजक श्री निलेश म्हात्रे यांनी बोलून दाखविले आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वता श्री निलेश म्हात्रे,मछिंद्र म्हात्रे,दीपक मुंडे, सौरव सावंत आणि संपुर्ण टिम विशेष मेहनत घेत आहेत.
अंतिम सामना मान्यवरांच्या उपस्थितीत होणार
दिवा दातिवली येथील रंगदार होत असलेल्या कब्बडी सामन्यांचा अंतिम सामना हा दिव्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.यावेळी ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी,श्री चरणदास म्हात्रे,मा.नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे,मा.नगरसेवक श्री शैलेश पाटील,मा.नगरसेवक श्री दिपक जाधव,श्री दिपक मुंडे,श्री गणेश मुंडे,मा.नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडे,श्री विनोद मढवी,श्री शशिकांत पाटील,श्री राजण किणे,श्री दिलखुश माळी,श्री सचिन चौबे,श्री उमेश भगत,श्री केशव पाटील,श्री महेश पाटील,श्री संतोष शिर्के आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत