एमआयडीसीचे संकेतस्थळ अखेर मराठीत – मराठी एकीकरण समितीनच्या मागणीला यश.
मुंबई, ता 5 डिसें (संतोष पडवळ) : गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी यांचे https://www.midcindia.org/home अधिकृत संकेतस्थळ व सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेत असल्याने #मराठी भाषिक नागरिक यांची गैरसोय होत होती.
महाराष्ट्र ई-प्रशासन धोरण २०११ परिपत्रकानुसार शासकीय संकेतस्थळे व त्यावरील माहिती मराठीत उपलब्ध करून देण्याचे तसेच शासकीय कामकाजात मराठीचा वापर करणे बंधनकारक असल्याचे वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित केलेले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे मराठी एकीकरण समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री आनंदा पाटील यांच्या निदर्शनास येताच तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार तक्रार नोंद प्रणालीवर मराठी भाषा विभागाकडे २०२० मध्ये मे आणि डिसेंबर महिन्यात दोन वेळा तक्रार नोंद केली होती. सदर दोन्ही तक्रारीवर कार्यवाही सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वरील तक्रारीबाबत संकेतस्थळावर १२ नोव्हेंबर २०२१ मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून दिला असल्याचे कळविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे विहित वेळेत ठोस कारवाई न झाल्याने जानेवारी २०२१ मध्ये मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केली होती. त्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडेच तक्रार नोंद करण्यासाठी अभिप्राय दिला होता.
Maharashtra Industrial Development Corporation – MIDC
आनंदा पाटील
उपाध्यक्ष,मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य