दिव्यातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषगटात वरदानदेवी क्रीडा मंडळ तर महिला गटात जोत्सनाताई भोईर गट प्रथम.
ठाणे,दिवा ता 5 डिसें (संतोष पडवळ ) वीर हनुमान मित्रमंडळ आणि समर्थ प्रतिष्ठान दिवा आयोजित भव्य तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली.या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणांहून 32 पुरुष संघांनी सहभाग घेतला तर 4 महिला संघांनीही सहभाग घेतला होता .
पुरुषगट प्रथम क्र वरदानदेवी क्रीडा मंडळ, संगमेश्वर, द्वितीय आई माऊली, रायगड तृतीय सद्गुरू कृपा, वडाळा. चतुर्थ विजेते प्रियल स्पोर्ट्स, डोंबिवली तर महिलागट विजेते प्रथम विजेते जोत्सनाताई भोईर गट तर द्वितीय निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब, घाटकोपर विजेते ठरले तसेच उतेजनार्थ मध्ये उत्कृष्ट पकड, चढाई तसेच लोकप्रिय खेळाडू अशी पुरुष व महिला गटात बक्षिसे देण्यात आली
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वता श्री निलेश म्हात्रे, मछिंद्र म्हात्रे,सौरव सावंत आणि संपुर्ण टिम विशेष मेहनत घेत आहेत.
ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी, श्री चरणदास म्हात्रे, मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे,मा नगरसेवक श्री दिपक जाधव,श्री दिपक मुंडे,श्री गणेश मुंडे, मा.नगरसेविका सौ.सुनिताताई मुंडे,श्री विनोद मढवी,श्री शशिकांत पाटील,श्री राजण किणे,श्री दिलखुश माळी,श्री सचिन चौबे,श्री उमेश भगत,श्री केशव पाटील,श्री महेश पाटील,श्री संतोष शिर्के आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते