सोशल मिडीयावरील फोटोवरून तलवारी बाळगणारे आरोपी पोलिसांनी केले जेरबंद.
ठाणे, ता 6 डिसें ( संतोष पडवळ) : दिनांक ०३/१२/२०२२ रोजी सोशल मिडियावर तलवारीने केक कापत असतांना व तलवारी जवळ बाळगणाऱ्या इसमांचे फोटो प्राप्त झाले होते. मा. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार शिळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी तलवारी जवळ बाळगणाऱ्या ०४ इसमांचा शोध घेऊन त्यांच्याकडून एकूण ०४ तलवारी हस्तगत केल्या असून त्यांच्याविरुध्द शिळ डायघर पोलीस ठाणे येथे गु. रजि. क्र. ३४६ / २०२२, गु. रजि. क्र. ३४७ / २०२२ व गु. रजि. क्र. ३४८ / २०२२, भा.ह. का. कलम ४, २५ सह महा. पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे एकूण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरील गुन्हयांत आरोपी नामे १) जिवन गंगाराम वालीलकर, वय ३५ वर्षे, धंदा – कन्स्ट्रक्शन, राहणार दहीसर मोरी, ता. जि. ठाणे, २) मोहंमद गुलजार पिरमोहंमद खान उर्फ राहुल उर्फ काल्या, वय २३ वर्षे, रा. दहिसर मोरी, ता.जि. ठाणे, ३) मोहंमद सोहेल रईस खान, वय ४० वर्षे, धंदा- कंन्स्ट्रक्शन, रा. दहिसर ठाकुरपाडा, ता. जि. ठाणे, ४) मोहंमद राशिद अब्दुल हय शाह, वय ३८ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा. दहिसर ठाकुरपाडा, ता. जि. ठाणे यांना अटक करण्यात आली आहे.