दिवा रेल्वे स्टेशन व परिसरातील गर्दुले हटवा – शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक
ठाणे, दिवा. ता 6 डिसें (संतोष पडवळ) : दिवा रेल्वे स्टेशन परिसरात नुकतीच ऐका जेष्ठ नागरिकाची हत्या झाली होती त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट), दिवा शहर, मा.आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन राम पाटील (उपशहर प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली दिवा रेल्वे (आर. पी. एफ. ) चे पोलिस निरीक्षक श्री. गिरीषचंद्र तिवारी यांना दिवा रेल्वे स्टेशन व परिसरामध्ये गर्दुले यांचा वाढता प्रभाव व गुन्हेगारी रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. प्रसंगी उपशहर संघटक प्रियंका सावंत , योगिता नाईक, राजेश भोईर ,अभिषेक ठाकूर, मच्छिद्रनाथ लाड , हेमंत नाईक, विकास इंगळे, विनया कदम , ओकेेश भगत , प्रतीक म्हात्रे , आशिष भोईर , तुषार सावंत, इतर पदाधिकारी उव कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदनाची दखल घेऊन आर. पी. एफ. पोलिस निरीक्षक श्री. गिरीष तिवारी यांनी योग्य ती कारवाई करण्याची आश्वासन दिले आहे.