दिव्यातील मुंब्रादेवी कॉलोनी साठी मिळाले वेगळं रिक्षा स्टँड
ठाणे, दिवा ता 7 डिसें (संतोष पडवळ) : दिव्यातील मनसेचे आमदार श्री.राजूदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून अखेर मुंब्रादेवी कॉलोनी साठी वेगळ्या रिक्षा स्टँडचे काम सुरू झाले आहे
मनसे आमदार श्री. राजूदादा पाटील यांनी ३० नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत दिवा विभागाचा दौरा केला होता. या दौऱ्यात स्टेशन परिसरात फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंब्रादेवी कॉलनी साठी रस्त्याच्या कडेला एका बाजूला रिक्षा स्टँड बनवण्याची सूचना आमदार राजूदादा पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांना केली होती. त्यानुसार आज पासून महानगरपालिकेकडून या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी दिव्यातील मनसेचे पदाधिकारी तुषार पाटील, प्रशांत गावडे उपस्थित होते.