दिवा, कळवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेचा हातोडा
ठाणे ( ता 07, संतोष पडवळ ) : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागसमित्यांमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.
त्यानुसार प्रभागसमितीतील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत कारवाई करण्यात येणार असून कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे व अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत आज कळवा आणि दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. आज कळवा गावदेवी मंदिराजवळ सतीश चित्रे यांच्या अनधिकृत बांधकामावर तर दिवा परिसरातील श्री. अली यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने हातोडा चालविला.