ठाण्यातील गोळीबारात जखमी गणेश कोकाटे याचा अखेर मृत्यू
ठाणे, ता 8 डिसें (संतोष पडवळ) : ठाण्याहून भिवंडी मार्गे कशेळी गावाच्या हद्दीतून काल सायंकाळच्या सुमारास कार मधून जात असताना अज्ञात बाईकस्वाराने सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, गणेश कोकाटे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे, गोळीबारा नंतर गंभीर अवस्थेत जखमी गणेश कोकाटेला ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे,
विशेष बाब म्हणजे मृतक गणेशने गेल्या पाच महिन्यापूर्वी नारपोली पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र पोलिसांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, त्यातच दोन महिन्यापूर्वी ठाण्यातील माजीवाडा परिसरात मृत गणेश वर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला होता, मात्र त्यावेळी तो बाल बाल बचावला, मात्र आज झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे पोलिसांनी मृत गणेशने जीवाला धोका असल्याच्या अर्जावर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे, जर पोलिसांनी त्याच्या अर्जाचा वेळीच विचार करून गांभीर्याने लक्ष दिले असते तर आज गणेश जिवंत असता अशी प्रतिक्रिया त्याच्या नातेवाईकांनी दिली
दरम्यान,मृत गणेश कोकाटे वर रॉबरी, चोरी,तसेच गंभीर हाणामारीचे गुन्हे दाखल असून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात कुटुंबासह राहत होता,
गोळीबाराच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गोळीबार करणाऱ्या शूटर ना पकडण्यासाठी भिवंडी ते ठाणे या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासण्यासाठी सुरुवात केली आहे,