मुंबईतील भांडुप विभागातील समाजसेविका नयना शाम तावडे यांना मातृशोक
मुंबई, ता 8 डिसें, किशोर गावडे
यशवंत चांदजी सावंत विद्यालयाच्या संचालिका ,व
भांडुप भाजपा विधासभा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. नयना शाम तावडे यांच्या मातोश्री श्रीमती रंजना रमेश सावंत यांना आज (दिं.७ डिसेंबर) सकाळी १०. वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ठाण्याच्या परम हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले .
डॉक्टरांचे उपचारीचे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मृत्यू समयी त्या 73 वर्षाच्या होत्या. मागील अनेक महिने त्या आजारी होत्या.
यशवंत चांदजी सावंत या विद्यालयाचे संस्थापक व शिक्षण महर्षी रमेश उर्फ दादा सावंत यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई
दोन मुलगे ,सूना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्याच्या दुःखद निधनाची बातमी भांडुप मध्ये पसरताच सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असोरंडी हे त्यांचं गाव.
त्यांचे नातेवाईक त्यांचे परिवार आप्तेष्ट सगेसोयरे यांनी
त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन
ठाणे तलाव पाळी येथील चित्ततोष अपार्टमेंट, चिंतामणी ज्वेलर्स मागे, घेतले.
दुपारी ठाण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले गेले.