ठाण्यात पुन्हा हत्या ; आरोपी सहा तासात वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात.
ठाणे, ता 9 डिसें (संतोष पडवळ) : दि. ८/१२/२०२२ (काल रात्री ) 9 वा. चे सुमारास ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी विलास पवार व त्याचे मावसभाऊ यांचेसह साईनाथनगर, भिमनगर येथील दुर्गामाता मंदीराजवळ बोलत उभे असताना तेथे १) जगदीश नरहिरे २) वैभव जगताप ३) राकेश यांनी फिर्यादी व त्यांचे भावांना शिवीगाळी करण्यास सुरवात केली तेव्हा जगदीश नरहिरे याने दिपक निरभवणे याने छातीत चाकुने वार करून त्यास जीवे ठार मारले तसेच फिर्यादी विलास पवार, प्रशांत निरभवणे यांचेवर चाकूने वार करून तसेच सळईने मारहाण करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी श्री विलास अशोक पवार वय ३४ वर्षे, रा. भिमनगर बिन्डींग नं. ५६ से समोर, गणेश गल्ली, वर्तकनगर, ठाणे यानी दिलेले तकारीवरून वर्तकनगर पोलीस ठाणे गुन्हा रजी. ४४१/२०२२ भा.द.वि.क. ३०२,३०७, १४३, १४४, १४६ ते १४९ प्रमाणे दिनाक ०९/१२/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी विलास अशोक पवार तसेच प्रशात निरभवणे, जगदीश नरहिरे हे गंभिर जखमी असल्याने हॉस्पीटलमध्ये दाखल आहे.
वरील गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त सो परि-५, ठाणे, मा. श्री निलेश सोनवणे सहा पोलीस आयुक्त सी. वर्तकनगर विभाग, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस व्ही निकम तसेच तपास पथक पोउपनिरी शेट्टी, पो.उप निरी. यादव, पोहवा सय्यद, पोना/ जाधव, पोना सावंत, पोना दरेकर, पोशि/ सौदागरे, पोशि/ जाधव, पोशि/ हिवरे, पोशि/ जामगे, पोना रावते यांनी सदर गुन्हयातील आरोपीत केवळ ६ तासात ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री एम. एस. कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्तकनगर, ठाणे पोलीस करीत आहेत