प्रसिद्ध अभिनेत्रीची वीणा कपूरची स्वतःच्या मुलाकडून हत्या.
मुंबई, ता 10 डिसें (संतोष पडवळ) : प्रसिद्ध अभिनेत्रीची वीणा कपूरची स्वतःच्या मुलाकडून हत्या झाली आहे.जुहूमध्ये एका 74 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. मात्र, ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर आहेत. इतकेच नाही तर या हत्येप्रकरणात पोलिसांनी वीणा कपूर यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदाराला अटक केलीये. वीणा कपूर यांच्या हत्येची बातमी ऐकताच सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वीणा कपूर यांच्याच मुलाने ही हत्या केलीये. जुहू पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंद करत वीणा कपूर यांचा मुलगा सचिन कपूर आणि त्याचा साथीदार लालूकुमार मंडल यांना अटक केलीये.