ठाणे स्मार्टसिटीच्या नागरिक आकलन सर्वेक्षणात ज्येष्ठांचाही सहभाग
ठाणे (ता 12, संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या विकासामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे देखील महत्वपूर्ण असे सहकार्य आहे. ठाणे शहरात प्रत्येक विभागात ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न केले जातील असे सांगत ठाणे स्मार्ट सिटी लि.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत नागरिक आकलन सर्वेक्षण अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती यांच्या सहकार्याने शुक्रवारी (09 डिसेंबर) वारकरी भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.